Friday 30 September 2022

Paper Articles

 1.International Trade

2.कोविड 19 चा प्रसार अवण बदलते अंतरराष्ट्रीय संबंध

3.Case study

Economics Acativity

 1.









Major and Minor Project

 1.Minor Project

2. Approval

3.Minor Project



कोविड 19 आणि बदलते आंतरराष्ट्रीय संबंध प्रा. प्रशांत तुकाराम गांजवे

 

कोविड 19 आणि बदलते आंतरराष्ट्रीय संबंध

प्रा. प्रशांत तुकाराम गांजवे

सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग, बळवंत कॉलेज, विटा, ता.खानपूर, जि.सांगली

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    डिसेंबर २०१९ मध्ये आलेल्या जागतिक संकटाने म्हणजेच कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग आज बदललेले दिसून येते. या काळामध्ये दोन देशातील आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये अमुलाग्र स्वरूपात बदल झालेले दिसून येतात. देशांमधील आंतरराष्ट्रीय व्यापार होत असताना त्यामधील पर्यटन हा घटक महत्वाचा असल्याचे दिसून येते. भारतात दर महिन्याला २१ लाख लोक विमानमार्गानी वेगवेगळया देशातून भारतात येतात. कोरोना कालावधीतही फार मोठया प्रमाणात परदेशातून लोक भारतात आले होते. ३० जानेवारी २०२० ला भारतातील केरळ राज्यात पहिला कोरोना विषाणू आढळून आला. या घटनेनंतर जगातील वेगवेगळया देशांनी आपल्या देशात येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली. यामुळे देशा-देशांमधील असणारे आंतरराष्ट्रीय संबंध बदललेले दिसून येतात.

       जगातील अनेक देशांमध्ये जी टाळेबंदी जाहीर केली आहे. त्या टाळेबंदीला परिणाम त्यांना भोगावा लागला. कारण या टाळेबंदीच्या कालावधीत फार मोठे नुकसान झालेले दिसून येते. ही झालेली हानी एका क्षेत्रापुरती मर्यादित न राहता ती सर्वच क्षेत्रात म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र या सर्वच क्षेत्राला या कोरोना महामारीच्या संकटाने फार मोठा फटका बसलेला दिसून येतो. या कालावधीत अनेक उद्योगधंदे डबघाईला आलेले होते. काही उद्योगधंदे तोटयात जावून ते आज बंद पडलेल्या स्थितीत आहेत. ही कोरोना महामारीवर दोन वर्षे उलटून गेले तरी अजूनही त्यावर गुणकारी लस वा औषध निर्माण झालेले नाही. जोपर्यंत औषध वा लस निर्माण होत नाही. तोपर्यंत आपणास आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. औषध वा लस निर्माण होत नाही तोपर्यंत जगातील लोकांचे जीवनमान व व्यवहार पूर्वी प्रमाणे सुरू होण्यास वेळ लागणार आहे. यातून भारताला आर्थिक, सामाजिक व मानसिक परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. या कोरोना महामारीच्या कालावधीत अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय बंद पडलेले दिसून येतात. अनेकांच्या शिक्षणात खंड पडलेला आहे. या सर्वांतून आज ना उद्या मार्ग निघेल आणि जगातील वेगवेगळया देशांचे संबंध सुधारतील. मानवी जीवनमान पुन्हा पूर्ववत सुरळीत होईल. यामाध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधही सुधारत जातील.

      या कोरोना महामारीच्या जागतिक संकटामध्ये एक चांगली गोष्ट घडताना दिसली ती म्हणजे या महामारीवर औषध शोधण्यासाठी वा लस निर्माण करण्यासाठी जगातील वेगवेगळया देशातील शास्त्रज्ञ एकत्र येवून औषध वा लस निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही लस शोधण्यासाठी विकसित देश, अविकसित देश, विकसनशील देशातील शास्त्रज्ञ एकजुटीने प्रयत्न करताना दिसतात. अमेरिका चीन, फ्रान्स, इटली आणि इंग्लंड, भारत या देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करताना दिसतात. त्याचप्रमाणे इतरही देशातील शास्त्रज्ञ या लसीच्या निर्माण करण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करीत आहेत. आपणास माहित आहे की हेच वेगवेगळया देशातील शास्त्रज्ञ स्वतः केलेल्या संशोधनाचे क्रेडीट, पेटंट मिळवणे यात मशगूल होते. तसेच ही वैज्ञानिक मंडळी आपला शोधनिबंध, संशोधन प्रसिध्द होईपर्यंत कमालीची गुप्तता पाळताना दिसतात. मात्र या महामारीच्या कालावधीत औषध वा लसीच्या निर्मितीबाबत जागतिक पातळीवर सर्वच स्थरांतील वैज्ञानिकामध्ये एवढया प्रचंड मोठया प्रमाणात सहकार्य केले गेले की, जर समजा यातील एखाद्या वैज्ञानिकाला आपल्या प्रयोगादरम्यान वा चाचणीमध्ये जर या विषाणूबाबत काही नवीन आढळून आले तर ते लगेच जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेल्या कॉन्फरन्स लींकवर जावून त्यावर असलेल्या इतर शास्त्रज्ञांना माहिती सांगतात. मग इतर देशातील वैज्ञानिक हे संशोधन, शोध पुढे घेवून जातात. यात ज्यांच्याकडे अद्यावत साधनसामग्री आहे ते या संकल्पनेचा मोठया प्रमाणावर विस्तार करतात. आजवर यातून २०० पेक्षा जास्त क्लिनीकल ट्रायल्स झालेल्या आहेत. चीनच्या वैज्ञानिकांनी कोणत्याही विषाणूचा एक जीनोम कोड असतो तसाच कोरोना विषाणूचा असलेल्या असाच जीनोम कोडचे डीकोडींग करण्यामध्ये यश मिळविले आहे. त्यामुळे आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली जगातील सगळे शास्त्रज्ञ  काम करत आहेत.

      परिणामी आज कोरोनाकाळाने जगाला एक नवी दिशा दिली आहे. जिथे सर्वच शास्त्रज्ञ एकत्र येवून काम करत आहेत. सर्व जगभरातील शास्त्रज्ञांमधील कोरोना काळातील ही सहकार्याची वृत्ती पुढील काळातही तशीच चालू राहिली तर जगात एक नवीनच सहकार्यांचे वातावरण निर्माण होईल. कारण सर्वसाधारणपणे शास्त्रज्ञ वा वैज्ञानिक वर्गातील लोक परस्परांना एवढे सहकार्य करताना दिसत नाहीत. कोरोनाविषयक संशोधनात त्यांनी केलेले काम हे अतिशय अप्रतिम व अनोख्या स्वरूपाचे आहे. बऱ्याचशा शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांनी पुण्याच्या सीरमया इंस्टीटयूटशी संपर्क साधला आहे. जेव्हा या सर्व जागतिक वैज्ञानिक समूहाला कोरोनावरील लस शोधण्यात यश येईल तेव्हा संपूर्ण जगासाठी त्याचे मोठया प्रमाणावर उत्पादन आणि वितरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी हे वैज्ञानिक ज्या ज्या संस्थांशी वा इंस्टीटयूटशी संपर्क साधत होते. त्यापैकीच एक आहे पुण्यातील सीरम इन्स्टिटयूट आज औषधांच्या वा लसीच्या मोठया प्रमाणावरील उत्पादनांच काम त्यांना दिले गेले आहे. त्यासाठी येणाऱ्या अवाढव्य खर्चाची रक्कम देण्यासाठी जगातील अनेक दानशूर पुढे आले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका शास्त्रज्ञाची न्यूयार्क  टाईम्सला एक मुलाखत छापून आली होती. त्यात त्यांनी असे सांगितले की, आम्ही जे संशोधन एकत्र येवून करतो त्यामध्ये माझा देश, तुझा देश, माझी भाषा, तुझी भाषा, माझा झेंडा, तुझा झेंडा असा कोणताही विचार नसतो. मात्र यांच्या अगदी उलट विविध देशाचे राज्यकर्ते मात्र त्याद्वारे परस्परांवर कुरघोडया करण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या देखील असेच चाललेले आहे. अमेरिका, चीन वा युरोपातील इतर देशांना दोष देत आहेत. युरोपातील राजकीय नेते इतर देशांना दोष देत आहेत. तर चीनमधील नेते अमेरिकाला दोष देत आहेत. जोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाला कोरोनाच्या संकटावर उपाय सापडत नाहीत. तोपर्यंत ते असेच एकमेकांना दोष देत राहणार आहेत. टाळेबंदीच्या काळात आपण सर्व व्यवहार ऑनलाईन पध्दतीने सुरू होते. यामध्ये अन्नधान्य, शिक्षण, औषधे, बॅंकिंग व्यवहार, या सर्वांचा समावेश होतो. या सर्व सेवा देणाऱ्या कंपन्या या जागतिक पातळीवर चीनच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे या माध्यमातून होणारे सर्व ऑनलाईन व्यवहारातून मिळणारा नफा हा चीन या देशाला मोठया प्रमाणात मिळू लागला. त्याचप्रमाणे चीन या देशाची अनेक देशातील मोठया कंपन्यांमध्ये भागीदारी असल्याचे दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने ज्या कंपन्या अग्रेसर आहेत त्यामध्ये बीग बास्केट, प्लीप कार्ड, पैसा बाजार, स्नॅप डील यांसारख्या कंपन्याचा समावेश होतो. या सर्वच कंपन्या ऑनलाईन बिझनेस करत आहेत. अगदी किचनमधील वस्तू, ऑनलाईन औषधे, विमा या सुविधा ऑनलाईन सहज उपलब्ध होवू लागल्या आहेत. म्हणजेच आर्थिक उलाढालीत चीन हा देश अग्रेसर असलेला दिसून येतो. आपण ज्या वस्तू आणि सेवा ऑनलाईन विकत घेता यामध्ये चीन या देशातील वस्तूंचा आणि कंपन्यांचा सहभाग मोठया प्रमाणात आहे. यामुळे त्यामधून चीनला मोठया प्रमाणात चलन प्राप्त होते. जागतिक बाजारपेठेत पाहिले तर आपणास सर्वात स्वत किंमतीच्या वस्तू या चीनी कंपन्यानी निर्माण केलेल्या दिसून येतात. अगदी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पाहिले तरी आपणाला दिसून येईल की आपण किती चीनी वस्तू वापरत आहे. आपण वापरत असलेल्या मोबाईलमध्ये कितीतरी अॅप हे चीनी कंपन्यांनी बनविलेली आहेत आणि या माध्यमातून चीन वेगवेगळया देशांवर आर्थिक आक्रमण करत आहे. सध्या जागतिक पातळीवर चीन हा देश आर्थिक क्रियांच्या बाबतीत पुढारलेला दिसून येतो.

                           जगाच्या इतिहासात गेल्या शंभर वर्षात कोणत्याही एवढया मोठया साथीच्या रोगाने थैमान घातले नव्हते. परंतु डिसेंबर 2019 मध्ये आलेल्या या कोरोना साथरोगाने जगातील 185 पेक्षा जास्त देशांमध्ये थैमान घातलेले दिसून येते. एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी अजून या साथ रोगावर गुणकारी औषध निर्माण झालेले नाही. या कालावधीत विकसित देश असतील वा अविकसित सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या दिसून येतात. या कालावधीमध्ये जगभरातील मोठे उद्योगधंदे डबघाईस आलेले दिसतात. कोरोना कालावधीत निर्माण झालेले साथीचे रोग आजही आपल्यात ठाण मांडून बसलेले आहेत. आपल्या समाजात साथीच्या रोंगाविषयी अनेक अफवा, गैरसमज, दंतकथा, अंधश्रध्दा पसरवल्या जात आहेत. प्लेग, पटकी, कॉलरा, देवी या साथीच्या रोगांबाबत हेच घडले आहे. जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी ऐतिहासिक घटना किंवा महामारी असं वर्णन करावे लागणाऱ्या कोविड-19 या साथीच्या रोगाचा फटका संपूर्ण जगाला बसलेला दिसून येतो. डिसेंबर 2019 मध्ये आलेल्या जागतिक संकटाने म्हणजेच कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग आज बदललेले दिसून येते. या काळामध्ये दोन देशातील आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये अमुलाग्र स्वरूपात बदल झालेले दिसून येतात. देशांमधील आंतरराष्ट्रीय व्यापार होत असताना त्यामधील पर्यटन हा घटक महत्वाचा असल्याचे दिसून येते. भारतात दर महिन्याला २१ लाख लोक विमानमार्गानी वेगवेगळया देशातून भारतात येतात. कोरोना कालावधीतही फार मोठया प्रमाणात परदेशातून लोक भारतात आले होते. आणि त्यामाध्यमातून भारतातही कोरोनाचा प्रसार झालेला दिसून येतो. सुरूवातीच्या काळात परदेशातून येणाऱ्या लोकांना विलग ठेवण्यात अपयश आल्यामुळे मोठया प्रमाणात या विषाणूने थैमान घातले. या विषाणूचा प्रसार कशा प्रकारे होतो, हे सांगण्यातही अपयश आले आहे. कोरोना कालावधीत जगातील देशांना फार मोठया प्रमाणात आर्थिक संकटांना सामना करावा लागला आहे. अजूनही या कोरोना महामारीवर गुणकारी औषध वा लस निर्माण झाली नाही. या लस निर्मितीच्या कार्यामध्ये जगातील सर्वच शास्त्रज्ञ एकजुटीने काम करतात हे मात्र यातून आपणास दिसून आले. एखाद्या शास्त्रज्ञाने लावलेल्या शोधामुळे तो शोध दूसरा शास्त्रज्ञ तेथून पुढे घेवून जातो. या कोरोना महामारीच्या कालावधीत आपणास वेगवेगळया देशातील शास्त्रज्ञांमध्ये असणारे सहकार्य, सामंजस्य हे दिसून आले. तसेच या कोरोना कालावधी जगातील वेगवेगळया देशातील नेत्यांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. न्यूयॉर्क, व्हिएतनाम यांसारख्या देशांनी या जागतिक महामारीवर यशस्वी मात केलेली दिसून येते.





 

  Khanapur Taluka    Self  Help  Group    Financial literacy    Survey   2022-23